ताजा खबरपुणेमनोरंजनमराठी

द हिंदू फाउंडेशन भाजपा प्रभाग २९ आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांच्या वतीने आयोजित घरचा गणपती, गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

Spread the love

 

पुणे.द हिंदू फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक २९ च्या वतीने घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा २०२४आणि प्रोफेशनल हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग आणि मेहंदी प्रशिक्षण आणि स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एस पी कॉलेज येथील लेडी रमाबाई हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण सोहळा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते आणि नेते मा. केशव उपाध्ये, स्थायी समिती पुणे महानगरपालिका माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ, भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या हस्ते झाला.

कार्यक्रमाला भाजपा प्रदेश चिटणीस ॲडव्होकेट वर्षा डहाळे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, माजी नगरसेवक दिपक पोटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस बाप्पू मानकर, भाजपा कसबा मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष करण मिसाळ, भाजपा पुणे शहर ओबीसी आघाडी अध्यक्ष नामदेव माळवदे, पतित पावन संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे यांची ही प्रमुख उपस्थिती होती.

द हिंदू फाउंडेशन च्या कार्याध्यक्षा जयश्री धनंजय जाधव यांनी उपस्तिथ मान्यवरांचे स्वागत केले. 

यावेळी घरचा गणपती सजावट स्पर्धेचे १ ते १५ आणि गौरी सजावट स्पर्धेतील १ ते १५ विजेत्यांना १ लाख रुपयांची रोख बक्षीस ट्रॉफी प्रमाणपत्र मा. केशव उपाध्ये यांच्या हस्ते देउन गौरवण्यात आले.

हेअर स्टाईल स्पर्धेतील १ ते १० , साडी ड्रेपिंग स्पर्धेतील १ ते १० आणि मेहंदी स्पर्धेतील १ ते १० विजेत्यांना भव्य ट्रॉफी, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देउन हेमंत रासने, वर्षा डहाळे, मोनिका मोहोळ, संदीप खर्डेकर, कुणाल टिळक, राजेश येनपुरे, दिपक पोटे, बाप्पू मानकर, करण मिसाळ, राजेंद्र काकडे, नामदेव माळवदे, माधव साळुंके, आणि पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धेत २३० कुटुंबानी सहभाग घेतला होता.

तर मेहंदी, साडी ड्रेपिंग, हेअर स्टाईल प्रशिक्षण वर्गात आणि स्पर्धेत २५६ महिला युवतींनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना कार्यक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी सांगितले की,

द हिंदू फाउंडेशन च्या वतीने आता पर्यंत तीन हजार महिलांना छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण दिले आहे. महिलांच्या सबलीकरणा बरोबर महिलांनी समाजाचं मुख्य प्रवाहात येण्यासाठी संस्था कामं करत आहे. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करून खेळाडू यांना ही प्रोत्साहित केले जाते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केशव उपाध्ये आपल्या भाषणात म्हणाले की, ज्या पद्धतीने मेट्रोच्या माध्यमातून शहर जोडण्याचे काम होत आहे त्या पद्धतीने एका घराला दुसऱ्या घरा बरोबर जोडण्याचे काम जाधव करत आहेत. आमच्या भगिनींना जोडण्याचे काम करत आहेत, महिलांना एकत्रित जोडणं, समाजाला एकत्रित जोडणं हे या अशाच कार्यक्रमातून होत असते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, नवरात्रीच्या आधी या विराट आदिशक्तीचे दर्शन होत आहे.

आपण जिजाऊ, सावित्रीबाई राणी लक्ष्मीबाई, यशोदेचे नाव घेतो पण येथे बसलेली महिला जेव्हा मुलाला शाळेत घेउन जाते तेव्हा सावित्रीबाई यांची भूमिका पार पाडते, मुलांवर संस्कार करताना जिजाऊंची भूमिका पार पाडते, संघर्ष करताना राणी लक्ष्मी बाईंच्या भूमिकेत असते, आणि शेजारी पाजारी लहान मुलांशी बोलताना यशोदेच्या भूमिकेत असते,

घराला सांभाळण्याचे, घराला आकार देण्याचे काम महिला घरी करत असते त्यामुळे महिला ही अबला असू शकत नाही कारण ति पुरुषा पेक्षा जास्त कामं करते. हिंदू फाउंडेशन च्या वतीने हा कार्यक्रम फक्त बक्षीस देण्यापुरता नसून महिलां प्रति त्यांचा सन्मान व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला ही सुजाण असते आणि या स्पर्धे निमित्त या महिलांच्या सुजानशिलतेला अधिक सन्मान देण्याच काम धनंजय जाधव आणि द हिंदू फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

हा खचा खच भरलेला हॉल, हॉल बाहेर थांबलेली माणसे यालाच नेता म्हणतात. उगीच कोणी असे कार्यक्रमाला गर्दी करत नाहीत तर त्या कार्यकर्त्या वर प्रेम असते म्हणून लोकं कार्यक्रमा ला गर्दी करतात.

हेमंत रासने, वर्षा डहाळे, मोनिका मुरलीधर मोहोळ, संदीप खर्डेकर, राजेंद्र काकडे यांचीही मनोगतं झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सीमा शिंदे, संध्या निकम, निलम चव्हाण, नीता भिसे, सुरेखा कलशेट्टी, मालती शिंदे, वनिता सोपे, लता पाटोळे, सुरेखा आल्हाट, राधिका ओव्हाळ यांनी परिश्रम घेतले. शिवा लोहकरे, रवींद्र कांबळे, तुषार ढावरे, गजानन साळी, बाबा मिसाळ, सिद्धी शिंदे, सुनील लोंढे, ओम शिंदे यांनी परिश्रम घेतले.स्पर्धेचे परीक्षण पूनम रासकर, निकिता आढाव, प्रमिला डांगरे, मृणाल शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार दिक्षित यांनी केले. रवींद्र कांबळे यांनी आभार मानले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button