चुनावताजा खबरपुणे

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा

Spread the love

पुणे. भारत निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघाअंतर्गत खर्च विषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, ए. वेंकादेश बाबू यांनी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.

 

यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक खर्च सोनाप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियत्रंण कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे, सर्व विधानसभा मतदार संघांसाठी नियुक्त सहायक खर्च निरीक्षक, खर्चविषयक सहायक समन्वयक अधिकारी, यांच्यासह सर्व संबंधित अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

उमेश कुमार म्हणाले, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवाव्यात. अवैधरित्या वाहतूक होणारे पैसे, दारू किंवा इतर आमिषाच्या बाबींवर विविध पथकांच्या माध्यमातून कडक लक्ष ठेवण्यात यावे. जिल्हा नियत्रंण कक्षात येणाऱ्या तक्रारी दैनंदिन निकाली काढून अहवाल सादर करावेत. सर्व बाबतीत सहायक खर्च निरीक्षक यांच्याशी संपर्कात राहून निवडणूक कामकाज पार पाडावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

श्री. बाबू म्हणाले, खर्च संवेदनशील मतदार संघांमध्ये एक भरारी पथक (एफएसटी), व एक स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) वाढवावे. या सर्व पथकांचे तीन पाळीमध्ये काम होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या

डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघ आहेत, मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एफएसटी, एसएसटी, व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आपापल्या मतदारसंघात कामे करीत आहेत. या आढावा बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही डॉ. दिवसे म्हणाले.

डॉ. दिवसे यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील कामकाजाबाबतचा आढावा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केला.

खर्च निरीक्षकांनी जिल्हा नियत्रंण कक्ष, सी- व्हिजिल आणि निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन कक्षातील कामकाजाचा आढावा घेतला. त्यानी कक्षातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button