पुणे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जागरुकता व सहभाग कार्यक्रमाअंतर्गत विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमांतर्गत वानवडी येथील हरीभाऊ गिरमे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, महादजी शिंदे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, महादजी शिंदे प्राथमिक विद्यालय, विठ्ठलराव शिवरकर विद्यालय, श्रीमती शांताबाई ढोले पाटील माध्यमिक विद्यालय, पुणे , महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालय ( उर्दु, मराठी व इंग्रजी माध्यम), एस. एस. पी. एम. एस. सोसायटीची माध्यमिक शाळा, सेंट मिराज इंग्लिश मिडियम सेकंडरी स्कूल अशा विविध शाळा तसेच महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना संकल्पपत्रा च्या ४ हजार प्रतींचे वाटप करण्यात आले. या संकल्पपत्रांमार्फत त्यांच्या घरातील आई-वडिल, बहीण भाऊ, आजी आजोबा तसेच कुटूंबातील सर्वच मतदारांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याबाबत प्रोत्साहीत करण्यात आले. या संकल्पपत्रांमार्फत नवयुवाना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.