विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
पुणे.भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेखे तपासणीच्या तरतूदीनुसार आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात ही तपासणी करण्यात येईल. खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी 9 नोव्हेंबर रोजी तर दुसरी 13 नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
दौंड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
दौंड भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेखे तपासणीच्या तरतूदीनुसार दौंड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे.
दौंड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात तहसील कार्यालय, दुसरा मजला, मिटींग हॉल , दौंड येथे ही तपासणी करण्यात येईल. खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी १० नोव्हेंबर रोजी तर दुसरी १४ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
बारामती. बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदरची तपासणी खर्च निरीक्षक सुमित कुमार यांच्या उपस्थितीत खर्च तपासणी कक्ष, प्रशासकीय भवन, २ रा मजला, इंदापूर रोड, बारामती येथे करण्यात येणार आहे.
सदरची उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तपासणी तीन टप्प्यात होणार असून पहिली तपासणी ९ नोव्हेंबर, दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
पुणे.भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेखे तपासणीच्या तरतूदीनुसार कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक उमेश कुमार यांच्या उपस्थितीत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ कार्यालय, श्री गणेश कला क्रीडा कलामंच, स्वारगेट येथील खर्च नियंत्रण कक्षात करण्यात येणार आहे. खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी तर दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.