चुनावताजा खबरपिंपरी चिंचवड़

उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे_मनवेश सिंग सिद्धू

Spread the love

पुणे. विधानसभा निवडणूक निर्भयपणे व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी उमेदवारांनी प्रचार करताना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक गोष्टीची रिसतर परवानगी घ्यावी, असे निर्देश चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. सिद्धू बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक श्री. सिद्धू म्हणाले, उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅली, रोड-शो, प्रचार सभा इत्यादी बाबत एक खिडक कक्ष योजनेअंतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ४८ तास अगोदर परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही परवानगी २४ तासांच्या आत देण्यात येईल. तसेच उमेदवारांकडून प्रचारासाठी वापरण्यात येणारे स्पिकर आणि वाहने याबाबतही परवानगी घेणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त प्रचार प्रसारासाठी जे पोस्टर्स छपाई करून घेतले जातात त्यावर संबंधित मुद्रणालयाचे नाव, संपर्क क्रमांक छापणे, एकूण छपाई केलेल्या पोस्टर्सचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास कळविणे आवश्यक आहे.

सोशल मिडीयाचा वापर प्रसिद्धीसाठी करताना प्रसिद्धीस दिलेला मजकुर प्रक्षोभक आढळल्यास उमेदवाराविरोधात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल. वर्तमानपत्र व टीव्ही चॅनल्सवर दिलेल्या जाहिरातीबाबतचा तपशील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास कळविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button