चुनावताजा खबरमराठी

वानवडी येथे लाचा लाईफ स्टाईल मॅनेजमेंट व वेलनेस सेंटरमध्ये मतदानाबाबत जनजागृती

Spread the love

पुणे. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ‘लाचा लाईफ स्टाईल मॅनेजमेंट वेलनेस सेंटर-वानवडी’ येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत भेट देऊन येत्या २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार असून लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वीप कक्षाचे समन्वयक भगवान कुरळे यांनी केले.

यावेळी स्वीप सहायक संकेत शिताफ़, दिव्यांग कक्षाचे नोडल नवनाथ चिकणे, वेलनेस सेंटरच्या प्रमुख डॉ. डिंपल ओसवाल, प्रशिक्षक रुपाली अजमेरे, श्वेता सोलंकी, शीतल शर्मा, तेजस भोज , कृष्णा पांडे तसेच सर्व प्रशिक्षणार्थी उपास्थित होते.

लोकशाहीच्या सर्वसमावेशक मूल्यांमुळे महिला आज सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. स्वातंत्र्याची मूल्ये अबाधित राहण्यासाठी लोकशाहीच्या अनमोल पर्वात सक्रिय सहभाग नोंदवून स्त्रियांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन श्री.कुरळे यांनी केले.

यावेळी उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमास जनसंपर्क व प्रसिध्दी कक्षाच्या समन्वय अधिकारी श्रीमती प्रज्ञाराणी भालेराव यांचे सहकार्य लाभले.

गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृती

स्वीप टीममार्फत सलग तीन दिवस सुट्टीमुळे शासकीय-निमशासकीय अधिकारी,कर्मचारी तसेच बहुतांश सोसायट्यांचे पदाधिकारी घरी असल्याचे लक्षात घेऊन सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये संकल्प पत्राचे वाटप करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

याअंतर्गत डॅफोडील्स गृहनिर्माण सोसायटी, लिलॅक गृहनिर्माण सोसायटी, लिली गृहनिर्माण सोसायटी, ट्युलीप गृहनिर्माण सोसायटी, ऑरचीड गृहनिर्माण सोसायटी, अँजी लिना गृहनिर्माण सोसायटी, फ्लॅमिंगो गृहनिर्माण सोसायटी, डहालिया गृहनिर्माण सोसायटी, कार्नेशन गृहनिर्माण सोसायटी, लव्हेंडर गृहनिर्माण सोसायटी, निवेदिता टेरेस १ व २ गृहनिर्माण सोसायटी, हेरीटेज प्लाझा गृहनिर्माण सोसायटी, कारलीस कोर गृहनिर्माण सोसायटी, ग्लोव्हर व्हिलेज गृहनिर्माण सोसायटी इ. सोसायट्यांना भेटी दिल्या. तसेच व्हिक्टरी व अपोलो चित्रपटगृहाच्या बाहेरील दर्शनी भागात मतदान जनजागृतीपर भित्तीपत्रके लावण्यात आली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button