
पुणे, : टीआरपीएस मॅनेजमेंट, अतुल ट्युटोरीयल्स् आणि लायन्स् क्लब पुणे रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तर्फे पहिल्या ‘टीआरपीएस कॉर्पोरेट करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिस संघाने केपीआयटी संघाचा २३ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
हिंजेवाडी येथील फोरस्टार मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना इन्फोसिस संघाने २० षटकामध्ये ८ गडी गमावून १८२ धावांचे लक्ष्य उभे केले. मधल्या फळीतील फलंदाज हर्षद तिडके याने २४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची खेळी केली. त्याला सागर बिरदवाडे याने ३९ धावा करून साथ दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना केपीआयटी संघाचा डाव १५९ धावांवर मर्यादित राहीला. केपीआयटीच्या मयुरेश लिखाते याने ५२ धावांची खेळी करून झुंझ दिली. त्याला अक्षय बढे (२३ धावा) आणि शिवराम गावडे (२२ धावा) यांनी साथ मिळाली. पण संघाचा विजय २३ धावांनी दुर राहीला आणि इन्फोसिसने विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण लायन्स् क्लब पुणे रहाटणीचे ला. वसंतभाऊ कोकणे, ला. शिवाजी माने, ला. महेश पांचाळ आणि अतुल ट्युटोरीयसल्स्चे संचालक अतुल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टीआरपीएस मॅनेजमेंटचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. विजेत्या इन्फोसिस संघाला आणि उपविजेत्या केपीआयटी संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सनी मारवाडी यांनी केले.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
इन्फोसिसः २० षटकात ८ गडी बाद १८२ धावा (हर्षद तिडके ५२ (२४, ८ चौकार, १ षटकार), सागर बिरदवाडे ३९, दत्तात्रय गाडे २-३३, सुधीर काळे १-२९) वि.वि. केपीआयटीः २० षटकात ७ गडी बाद १५९ धावा (मयुरेश लिखाते ५२ (३८, ६ चौकार, २ षटकार), अक्षय बढे २३, शिवराम गावडे २२, अलोक नागराज २१, पिराजी रूपनुर २-२३, आशय पालकर २-२९); सामनावीरः हर्षद तिडके;
वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः संदीप संघई (२२८ धावा आणि ४ विकेट, इन्फोसिस);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः मंगेश पाटील (२४१ धावा, केपीआयटी);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः दत्ता्रत गाडे (१२ विकेट, केपीआयटी);