खेलमराठीशहर

पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथी ‘फ्रेंडशिप करंडक’ २०२५ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा !!

समर्थ चॅलेंजर, गजर सुपरनोव्हा, नादब्रह्म सर्ववादक, शिवमुद्रा ब्लास्टर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, रमणबाग फायटर्स संघांची बाद फेरीकडे वाटचाल !!

Spread the love

पुणे.  पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत समर्थ चॅलेंजर, गजर सुपरनोव्हा, नादब्रह्म सर्ववादक, शिवमुद्रा ब्लास्टर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स् आणि रमणबाग फायटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून बाद फेरीकडे वाटचाल केली आहे.

सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रसाद काची याने केलेल्या ४३ धावांच्या जोरावर समर्थ चॅलेंजर संघाने नादब्रह्म ड्रमर्सचा ४७ धावांनी सहज पराभव केला. ऋषी बिबावे याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर गजर सुपरनोव्हा संघाचा ९ गडी राखून पराभव केला. रोहन पवार याने फटकावलेल्या नाबाद ८२ धावांमुळे नादब्रह्म सर्ववादक संघाने गरूड स्ट्रायकर्स संघाचा ९ गडी राखून पराभव करून बाद फेरीकडे वाटचाल केली.

रूपक तुबाजी याने केलेल्या ८६ धावांच्या जोरावर शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाने एचटीएम टायगर संघाचा ५६ धावांनी सहज पराभव केला. अभिजीत देसाई याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे महालक्ष्मी मॅव्हरीक्स्ने मंडई मास्टर्सचा ९ गडी राखून सहज पराभव केला आणि बाद फेरीकडे वाटचाल केली. विराज राऊत याने केलेल्या फलंदाजीमुळे रमणबाग फायटर्सने तुळशीबाग टस्कर्सचा ५ गडी राखून पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
समर्थ चॅलेंजरः ८ षटकात ४ गडी बाद ११७ धावा (प्रसाद काची ४३ (१२, १ चौकार, ६ षटकार), तन्मय गायकवाड ३५, श्रेयस भंडारी २-३१) वि.वि. नादब्रह्म ड्रमर्सः ८ षटकात ५ गडी बाद ७० धावा (पार्थ नायकुडे २३, श्रेयांक जैन १६, मॅक परदेशी ३-२); सामनावीरः प्रसाद काची;

युवा योद्धाज्ः ८ षटकात ९ गडी बाद ६९ धावा (विनायक शेडगे १७, शुभम बलकवडे ३-१९, ऋषी बिबावे २-१९) पराभूत वि. गजर सुपरनोव्हाः ४.५ षटकात १ गडी बाद ७२ धावा (संतोष गायकवाड नाबाद ३५, ऋषी बिबावे नाबाद २४, समर्थ हरहारे १-२४); सामनावीरः ऋषी बिबावे;

गरूड स्ट्रायकर्सः ८ षटकात ४ गडी बाद ८६ धावा (विशाल गुलमे नाबाद ३७, अविनाश क्षत्रिय १७, स्वप्निल घाटे २-९) पराभूत वि. नादब्रह्म सर्ववादकः ६.२ षटकात १ गडी बाद ९२ धावा (रोहन पवार नाबाद ८२ (३२, ६ चौकार, ९ षटकार); सामनावीरः रोहन पवार;

शिवमुद्रा ब्लास्टर्सः ८ षटकात ४ गडी बाद १६६ धावा (रूपक तुबाजी ८६ (३४, ६ चौकार, ८ षटकार), रोहीत खिलारे ६२ नाबाद (१९, ४ चौकार, ६ षटकार) वि.वि. एचटीएम टायगरः ८ षटकात ६ गडी बाद ११० धावा (अजिंक्य मारटकर ३८, अजित गवळी ३८, रोहीत खिलारे १-१३); सामनावीरः रूपक तुबाजी;

मंडई मास्टर्सः ८ षटकात १० गडी बाद ५५ धावा (अथर्व सी. १९, अभिजीत देसाई २-१४) पराभूत वि. महालक्ष्मी मॅव्हरीक्स्ः ४ षटकात १ गडी बाद ५६ धावा (अभिजीत देसाई नाबाद ३७ (१३, ४ चौकार, ३ षटकार), शिवम पाटील नाबाद १९; सामनावीरः अभिजीत देसाई;

तुळशीबाग टस्कर्सः ८ षटकात ५ गडी बाद १०२ धावा (अमित सावळे ३४, किरण पतंगे २४, प्रसाद घारे १-१७) पराभूत वि. रमणबाग फायटर्सः ६.२ षटकात ५ गडी बाद १०८ धावा (विराज राऊत नाबाद ४० (१४, ४ चौकार, ३ षटकार), सत्यजीत पाळे २९, नितीन पंडीत ३-३३); सामनावीरः विराज राऊत;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button