मराठी समाचार

साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल ला फिडे बुद्धिबळ शाळा सुवर्ण पुरस्कार प्रदान

Spread the love

पुणे
(क्रीडा प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या योग प्रात्यक्षिक आणि संगीत कार्यक्रमाचे आयोजन साधू वासवानी इंटरनॅशनल शाळेमध्ये करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे औचित्य साधून (फिडे) जागतिक बुद्धिबळ संघटने चे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी नुकतेच मोशी येथील साधू वासवानी इंटरनॅशनल शाळेला जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या एज्युकेशन कमिशन कडून फिडे बुद्धिबळ शाळा सुवर्ण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. ह्या पुरस्काराचे प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी जागतिक बुद्धिबळ संघटनेचे (फिडेचे) एज्युकेशन कमिशनचे सदस्य बोरीस ब्र्हुन ( जर्मनी),भारताचे ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे,तसेच फिडेच्या सोशल कमिशनचे अध्यक्ष श्री आंद्रे व्हॉग्टलीन ( स्वित्झर्लंड), सचिव लासमा कोकोरेव्हिका (लॅटव्हिया) आणि जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या (फिडे) मिडीया च्या भारताच्या प्रतिनिधी नंधिनी सारीपल्ली हे प्रतिनिधी मंडळ उपस्थित होते. यावेळी ह्या प्रतिनिधी मंडळाच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील,शाळेचे बुद्धिबळ प्रशिक्षक केशव अरगडे, बुद्धिबळ खेळाचे प्रातिनिधिक स्वरूपात दोन विद्यार्थी यांना पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी संपूर्ण कार्यक्रमात आपली उपस्थिती राखून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मुख्यत्वे विदेशी प्रतिनिधी मंडळ जर्मन भाषिक असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत जर्मन भाषेत करण्यात आले. यानंतर शाळेच्या संगीत शिक्षकांनी सादर केलेल्या शास्त्रीय संगीताने मान्यवर मंत्रमुग्ध झाले. उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी प्रेक्षक नंतर जर्मन भाषेतील स्वागत गीत ऐकून थक्क झाले. यानंतर शाळेच्या इयत्ता दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या योग प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यावेळी शाळेच्या ५ वी ते ८वी वर्गांच्या समन्वयिका रोशन जॉर्ज यांनी उपस्थितांची ओळख करून देऊन, संपूर्ण जगभरातून २२ शाळांनी ह्या पुरस्कारासाठी अर्ज केला होता,यातील १३ शाळांना सुवर्ण,६ शाळांना रजत आणि ३ शाळांना कांस्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.भारतातील केवळ दोन शाळांना सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला.महाराष्ट्रातील सर्वप्रथम हा पुरस्कार मिळवण्याचा मान साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल मोशी यांनी मिळवला आहे. दुसरी शाळा चैन्नई येथील वेल्लमल स्कूल या शाळेला मिळाला आहे ज्या शाळेतून भारताचे नऊ दिग्गज ग्रॅंडमास्टर्स तयार झाले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील यांनी जागतिक बुद्धीबळ संघटनेच्या(फिडे) प्रतिनिधी मंडळाचे स्वागत केले. यानंतर पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी जागतिक बुद्धिबळ संघटनेचे ( फिडेचे ) सोशल कमिशनचे अध्यक्ष आंद्रे व्हॉग्टलीन यांनी शाळेच्या बुद्धिबळातील विशेष उपक्रमांचे,तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे यांच्या आग्रहास्तव स्वतः पर्वतासन विद्यार्थ्यांसमोर करुन दाखवले आणि योगाचे ही महत्व पटवून दिले. यावेळी फिडेचे एज्युकेशन कमिशनचे बोरीस ब्र्हुन यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील यांचे व शाळेतील बुध्दिबळ उपक्रमांची दखल घेत कौतुक करुन या पुरस्कारासाठी शाळेत घेण्यात येणारे उपक्रम आणि सुविधा कारणीभूत आहेत हे पटवून दिले. यावेळी फिडे प्रतिनिधी मंडळाने फिडे या जागतिक संघटनेला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील आणि शाळेचे बुद्धिबळ प्रशिक्षक केशव अरगडे यांना फिडेचे नुकतेच स्वित्झर्लंड येथे प्रकाशित झालेले पोस्ट टिकिट, पाकिट आणि भेटकार्ड प्रदान केले. यावेळी या सर्व उपस्थितांनी शाळेच्या संगीत व बुध्दिबळ कक्षाला भेट दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या संगीत व योग शिक्षकांनी केले. यावेळी शाळेचे सर्व क्रीडा शिक्षक,विषय व वर्ग शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button