पुनित बालन यांच्या पीबीजी बेंगळुरू स्मॅशर्स ने अल्टिमेट टेबल टेनिस 2024 साठी सर्वोत्तम संभाव्य संघ निवडला
यूटीटीच्या आगामी हंगामात प्रथमच आठ संघ असतील. 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत 16 परदेशी खेळाडूंसह एकूण 48 खेळाडू रिंगणात असतील_
मुंबई. जुअल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) फ्रँचायझी पीबीजी बेंगळुरू स्मॅशर्स ने मुंबईत पार पडलेल्या प्लेअर ड्राफ्टमध्ये यूटीटी 2024 साठी सर्वोत्तम संभाव्य संघ निवडण्यासाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली.
यूटीटी लीग 2024चा आगामी हंगाम 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2024 दरम्यान चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.
नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (टीटीएफआय) संयुक्त विद्यमाने फ्रँचायझी आधारित लीग प्रमोट केली आहे.
भारतीय टेबलटेनिसच्या प्रगतीला मदत करण्यासह खेळाडूंना आणखी एक सक्षम व्यासपीठ करणे, हा अल्टिमेट टेबल टेनिसचा एकमेव उद्देश आहे. आमची लीग ही प्रशिक्षक, अकॅडमी आणि स्पर्धांसह संपूर्ण इकोसिस्टमला पाठिंबा देईल. आजचा प्लेअर ड्राफ्ट या गोष्टीची साक्ष आहे की जगातील काही सर्वोत्तम खेळाडू आता यूटीटीमध्ये येऊन खेळू इच्छित आहेत. यूटीटी 2024 हंगामासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आठ संघ खेळवण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि आम्हाला त्यात सातत्य राखायचे आहे. आम्ही सर्व संघांना आगामी हंगामासाठी शुभेच्छा देतो, असे यूटीटीचे प्रमोटर विटा दानी आणि निरज बजाज म्हणाले.
पीबीजी बेंगळुरू स्मॅशर्सकडे स्पेनचा अल्वारो रॉबल्स आणि अमेरिकेची लिली झांग असून रिटेन केलेली स्टार मनिका बत्रावरही त्यांची भिस्त आहे.
आम्हाला मिळालेल्या संघामुळे मी खूप आनंदी आहे. मनिका बत्राला कायम ठेवून, आम्ही अल्वारो रॉबल्स आणि लिली झांग या अनुभवी जोडीला परदेशी आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून निवडण्याला प्राधान्य दिले, ज्यामध्ये अँथनी अमलराज आणि जीत चंद्रा हे भारतीय पुरुष पॅडलर्ससाठी योग्य सपोर्ट कास्ट आहेत. प्रतिभावान तरुण पॅडलर तनीशा कोटेचा देखील एक उत्तम अॅडिशन म्हणून पुढे आला आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा संघ प्रतिस्पर्ध्यांना चांगले आव्हान देईल, असे पीबीजी बेंगळुरू स्मॅशर्सचे मालक पुनित बालन म्हणाले.
प्लेअर ड्राफ्टनंतर फ्रँचायझींनी त्यांच्या सहा सदस्यीय संघांना अंतिम रूप दिल्याने 16 परदेशी खेळाडूंसह एकूण 48 खेळाडू लीगमध्ये खेळताना दिसतील.
यूटीटी लीग आगामी हंगाम स्पोर्ट्स18 वर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय जिओ सिनेमावरही ही लीग पाहता येईल.