मराठी समाचार

खाजगी कंपन्यांचे हित जोपासण्यासाठी, केंद्र सरकार कडून बीएसएनएल (भारत संचार निगम लि)चा बळी देण्याचा डाव..! – गोपाळ तिवारी 

Spread the love

पुणे. खाजगी कंपन्याना स्पर्धक असलेली एकमेव कंपनी तोटा सहन न करता, वा दर न वाढवताही ग्राहकांना सेवा देते.. मात्र बीएसएनएल ला विकसीत होण्यापासुन, तसेच ४जी सेवा देण्यापासून रोखले जात असल्याचे मोदी सरकारचे देश हित विरोधी मनसूबे लपुन राहीले नसल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. ते गोखले रोड वरील (कलाकार कट्टा चौकांत) ‘मोबाईल दरवाढ विरोधी – पुणे शहर काँग्रेसचे अघ्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकार एकीकडे बीएसएनएल ला आत्म निर्भर करण्यासाठी अमेरीका स्थित BCG (बोस्टन कं ग्रुप) ला १३२ कोटींचे काँट्रंक्ट देते मात्र BSNL ने ४जी/५जी करीता चीन, जर्मन कडुन अद्यावत यंत्र सामुग्रीचे मागवलेले टेंडर मात्र रद्द करते हाच मुळात केंद्र सरकारची राष्ट्रीय कंपनी खच्ची करण्याचे प्रयत्न करण्याची देशद्रोही भुमिका आहे..!

चिन मधील ४जी – ५जी तंत्रज्ञान सहाय्य उत्पादक उपकरणे शत्रु राष्ट्र म्हणून बीएसएनएल ला केंद्र सरकार खरेदी करू देत नाही. त्यामुळे ४जी / ५जी सेवा देशात खाजगी कंपन्या सुरु करून सुध्दा बीएसएनएल मात्र तंत्रज्ञान अभावी सुरू करु शकत नाही मात्र तीच् ‘चिन ची ऊत्पादक यंत्र सामग्री’ जीओ, एअरटेल, वोडा फोन इ मात्र आयात शुल्क भरुन खरेदी करून.. देशभर वर्षानुवर्षे ४जी / ५जी सेवा देतात व ३जी पेक्षा ही प्रती ग्राहक किमान १०० रू जास्त उकळतात.. सरकार हे ऊधड्या डोळ्याने पाहते आहे खाजगी कंपन्यांच्या दरवाढी बाबत अनुकुल भुमिका घेत, जाणीवपुर्वक बीएसएनएल ची गळचेपी करत त्यांना स्पर्धे_योग्य ठेवत नसल्याची कट कारस्थाने रचत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “मोबाईल दरवाढ विरोधी काँग्रेसच्या आंदोलनात” केला..!

या प्रसंगी ॲड अभय छाजेड, पुणे शहर युवक काँग्रेस अघ्यक्ष सौरभ अमराळे, अजीत दरेकर, महीला काँग्रेस ऊपाध्यक्षा  संगीता तिवारी, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, राजेंद्र शिरसाठ, छाया जाधव, मुकबुल शेख, अजीत जाधव, शिवराज भोकरे, अक्षय माने, ॲड संदीप ताम्हणकर, घनश्याम निम्हण, ॲड सचिन अडसूळ, महीला, युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते भर पावसात ऊपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button