पुण्यातील रुग्णाचे मौल्यवान जीव वाचविण्यात यश
पुणे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, येथे हवाई मार्गे रायपुरच्या एका खाजगी रुग्णालयातून फुफ्फुस सुखरूपपणे आणण्यात आले. ह्या अवयवदात्याला वैद्यकीय तज्ञांच्या मंडळाने मेंदू मृत घोषित केले होते. दात्याच्या कुटूंबीयांच्या धाडसी निर्णयामुळे अवयवाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पुण्यातील रुग्णाला नवजीवन मिळाले असून त्याच्यावर फुफ्फुस अवयवाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
अवयव प्राप्त होताच, काळजीपूर्वक आणि ठराविक वेळेच्या आतच त्यांचे प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. हे अवयव हवाईमार्गे रायपूर हून पुणे विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर वाहतूक पोलीस विभागाच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉरद्वारे डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी येथे आणण्यात आले. यासाठी एकूण ३ तासांचा कालावधी लागला. त्यासाठी रायपूर आणि पुणे पोलिस विभाग, तसेच विमानतळाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो ज्यांनी ग्रीन कॉरिडॉर करून अवयव सुलभरित्या रुग्णालयात पोचविण्यासाठी मदत केली.
अवयव प्रत्यारोपण होणारा रुग्ण H1N1 ARDS संबंधित आजाराने ग्रस्त होता. आणि उपचारांसाठी पुण्यातील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, परंतु तिथे काही आजारामध्ये सुधार येत नसल्याने प्रगत उपचारासाठी त्याला डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी येथे दाखल करण्यात आले. रुग्णाला एक्सटाकोरपोरियल मेंब्रेन ऑक्सीजनेशन (ECMO) नावाच्या प्रगत उपकरणाद्वारे ऑक्सीजन देण्यात येत होते. आजार अधिक बळवल्याने त्यांना फुफ्फुस प्रत्यारोपणाची गरज होती त्यामुळे जलद गतीने अवयव मिळावे यासाठी विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र यांच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव नोंदविण्यात आले होते. फुप्फस प्राप्त होताच निर्धारित वेळेत त्याच दिवशी यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. रुग्णाने अवयव योग्य प्रतिसाद दिल्याने रुग्ण लवकरच बरा होईल.
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, हे पुण्यातील एकमेव हॉस्पिटल आहे जे फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यासाठी सुसज्ज आणि प्रमाणित आहे. तसेच हॉस्पिटलने गेल्या दोन आठवड्यांमध्ये केलेले हे दुसरे फुफ्फुस प्रत्यारोपण आहे. हे अवयव दान आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जुळून आलेला संस्मरणीय औचित्य आहे, कारण सर्व अडथळ्यांना झुगारून विक्रमी वेळेत १०३३ किलोमीटर अंतर पार करून छत्तीसगडमधून अवयव पुण्याला पोहोचवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
डॉ. पी.डी. पाटील, कुलपती डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, म्हणाले, “अवयव प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे लोकांना नवीन जीवन मिळते आणि असंख्य रुग्णांसाठी हे प्रत्यक्षात आणताना आम्हाला अभिमान वाटतो. आज बहु-अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अत्याधुनिक आरोग्य सुविधा आणि सक्षम कुशल डॉक्टरांच्या टीममुळे आम्ही आणखी रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास सज्ज आहोत.”
यावर भाष्य करताना डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, म्हणाले, “आमचे ध्येय डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे आरोग्य सुविधा सक्षम करणे हे आहे. ज्याला अत्याधुनिक पायाभूत सुविधांची जोड असेल, जे रुग्णांच्या गुंतागुंतीच्या परिस्थितींना हाताळण्यास मदत करेल आणि आवश्यक रुग्णांना नवजीवन भेट देण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने सक्षम आहोत. मी रायपूर आणि पुण्याच्या वाहतूक पोलिस विभागांचे मनापासून आभार मानते आणि आमच्या कुशल डॉक्टरांचे मनापासून अभिनंदन करते ज्यांच्यामुळे ही अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रिया सुलभतेने पार पडली.”
डॉ. यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे म्हणाले, “मी यामध्ये सहभागी असलेल्या तज्ञ डॉक्टरांचा आभारी आहे आणि आणखी एक आव्हानात्मक अवयव प्रत्यारोपण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सहभागी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. आम्ही विविध गंभीर उपचारांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि ही एक ऐतिहासिक शस्त्रक्रिया त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
डॉ. संदीप अट्टावार, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, ” अवयवदान हे एक उदात्त कार्य आहे. या बहुमूल्य दानामुळे आम्ही एक मौल्यवान जीव वाचवू शकलो. आम्ही जलद कृती करून वेळेत अवयव आणले आणि त्याचे प्रत्यारोपण केले. ही पहिल्यांदाच अशी वेळ आहे जिथे रायपूर हून पुण्याला सुखरूप अवयव आणून रुग्णालयातील प्रगत तंत्रज्ञानामुळे आणि कुशल डॉक्टरांच्या सहाय्यामुळे अवयव यशस्वीरीत्या प्रत्यारोपण केले. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे आम्हाला अशा जटिल शस्त्रक्रिया अत्यंत सहजतेने आणि अचूकपणे करण्यात मदत होते आणि त्यामुळेच शक्य तितक्या जास्त लोकांचे जीव वाचवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित मिळते.”