ताजा खबरधर्मपुणे

कोथरूडमध्ये महा कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन

नामदार चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

Spread the love

पाच हजार पेक्षा जास्त मुलींचे होणार पूजन

पुणे.नवरात्रोत्सव काळात कन्यापूजनाचे वेगळे महत्त्व असून, नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये महा कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या अद्भूत सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात नामदार पाटील यांनी केले आहे.

धार्मिक श्रद्धांनुसार,नवरात्रोत्सव काळातील नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. या उपासनेने दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांच्या जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यासोबतच कन्यापूजना शिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही, अशी देखील धारणा आहे.

त्यामुळे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आणि उत्सवाच्या निमित्ताने उपासनेचे फळ सर्वांना लाभावे यासाठी नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरुड मध्ये महा कन्यापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील सात मुलींचे पूजन करणार आहेत. मंत्रोच्चाराच्या घोषात, आध्यात्मिक वातावरणात दिनांक ११ ऑक्टोबर रोजी कोथरुड मधील शुभारंभ लॉन्स येथे सायंकाळी ४.३० ते ७ वेळेत हा नयनरम्य सोहळा संपन्न होणार आहे.

शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणार्‍या मातांची रूपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींमध्ये ही रूपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरूप असते. तिच्या जन्माने प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि भरभराट होते. नवरात्रोत्सव काळात तिची पूजा म्हणजे साक्षात, आदिमायेची पूजा करणे आहे. मागील पाच वर्षांत कोथरुड मधील मुलींचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून हजारो मुलींचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासोबतच मानसी सारख्या उपक्रमातून वस्ती भागातील मुलींच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोथरूड मध्ये आयोजित महा कन्यापूजन सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button