पुणे.नवरात्रोत्सवानिमित्त राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतपाटील यांनी आज पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या चतु: शृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी दर्शनासाठी आलेल्या माता भगिनींनी शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण आणि उच्च शिक्षणासाठी मुलींच्या फी माफीच्या निर्णयाप्रती आनंद व्यक्त केला.
नवरात्रोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्वच शक्तीपीठ आणि तीर्थस्थांनावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुण्यातील चतु:शृंगी देवी हे पुणेकरांचे श्रद्धास्थान असून; वणीच्या सप्तशृंगीचे प्रतिरुप म्हणून चतु:शृंगी देवीवर सर्वांची श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात चतु: शृंगीच्या दर्शनासाठी पुणे आणि आसपासच्या परिसरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणेकरांचे श्रद्धास्थान चतु:शृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या माता भगिनींनी शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणि उच्च शिक्षणासाठी मुलींच्या फी माफीच्या निर्णयाप्रती आनंद व्यक्त केला.
महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन नेहमीच कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.