पुणे.महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी , राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, खा. डॉ. मेधा कुलकर्णी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय राखत पुणे महानगर,पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक म्हणून विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकण्याचा मी संकल्प केला आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची या महत्वाच्या पदावर नियुक्ती केल्याचे जाहीर केल्यावर संदीप खर्डेकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
” मी पंचवीस वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत असून पुणे शहर प्रचार प्रसिद्धी प्रमुख, पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, शहर सरचिटणीस अश्या विविध पदांवर काम केले असून सध्या प्रदेश प्रवक्ता म्हणून जबाबदारी पार पाडत असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे, बारामती व शिरूर मतदारसंघात महायुतीचा समन्वयक म्हणून काम केले आहे. पक्ष संघटनेत निष्ठेने दिलेली जबाबदारी पार पाडत असल्यामुळे मा. देवेंद्रजी फडणवीस, मा. चंद्रशेखर बावनकुळे, मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी ही महत्वाची जबाबदारी सोपविली असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.केवळ राजकीय पक्षच नव्हे तर विविध ज्ञाती संस्था, सामाजिक संस्था / संघटना यांच्याशी ही संपर्कात असून ह्या सर्वांना सोबत घेऊन महायुतीच्या प्रचारात त्यांचा सक्रिय सहभाग असेल, असेही खर्डेकर म्हणाले.
मी जिल्ह्यात मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या विद्यमान लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संपर्कात असून महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यावर प्रत्येक मतदारसंघात महायुतीचे मेळावे, बैठका घेऊन सर्व एकवीस उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन असेही संदीप खर्डेकर म्हणाले. महायुतीतील सर्व सहयोगी पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज असून राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा विश्वास ही संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.