चुनावताजा खबरपुणेमराठी

आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या २४ तासात शासकीय मालमत्तेवरील साडेचौदा हजार प्रचारसाहित्य हटविले-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Spread the love

पुणे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता जिल्ह्यात १५ ऑक्टोबर रोजी लागू झाल्यानंतर पहिल्या २४ तासात सर्व मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने शासकीय इमारती आणि शासकीय मालमत्तेच्या आवारातील जाहिरात फलके, भित्तीपत्रके, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज आदी एकूण १४ हजार ५४२ प्रचारसाहित्य तात्काळ प्रभावाने हटविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

जुन्नर विधानसभा मतदासंघात १ हजार १६९, आंबेगाव १ हजार ४३०, खेड आळंदी १ हजार ४४६, शिरूर ५६९, दौंड १ हजार ५३०, इंदापूर ८२८, बारामती ८९०, पुरंदर १ हजार ९६६, भोर १५५, मावळ १ हजार १५४, चिंचवड १ हजार ७, पिंपरी (अ.जा.) ३८, वडगांव शेरी १५८, भोसरी ६५३, शिवाजीनगर १४८, कोथरुड १८५, खडकवासला ५६७, पर्वती २४५, हडपसर २३८, पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) ९१, कसबा पेठ मतदार संघात ७५ असे फलके, होर्डिंग्ज, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज असे शासकीय मालमत्तेवरील एकूण १४ हजार ५४२ प्रचारसाहित्य हटविण्यात आले आहेत. यामध्ये भित्तीवरील लिखान १ हजार ९८६, भित्तीपत्रके ३ हजार ६८५, जाहिरात फलके १ हजार ६४७, बॅनर्स २ हजार ७९५, ध्वज १ हजार ४३० आणि इतर साहित्य २ हजार ९९९ यांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. दिवसे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button