ताजा खबरमराठीमहाराष्ट्र

अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी

Spread the love

पुणे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. पुणे जिल्हयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणांत व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने शस्त्र अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जिवीत हानी तसेच सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये यासाठी डॉ.सुहास दिवसे,जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ व शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७(३) (ओ) व (बी) अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्हयात दिनांक २५ नोव्हेंबर,२०२४ रोजी २४-०० वाजेपर्यंत पर्यंत परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बरोबर बाहून नेण्यास मनाई केली आहे.

बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँकेची/संस्थांची/अधिकाऱ्यांवर राहिल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button