पुणे. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजाकरिता २७९ मतदान केंद्रांमध्ये नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना निवडणूक कर्तव्ये व जबाबदा-या याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा भोसले, स्वीप समन्वय अधिकारी भगवान कुरळे उपस्थित होते.
अंतिम मतदार यादी घोषीत करणेत आली असून त्यानुसार सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रामधील क्षेत्रात जबाबदारीपूर्वक व गांर्भियपणे निवडणूक कामकाज करावे, मतदारसंघामधील असणारे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व इतर नागरिकांकडून भ्रमणध्वनी द्वारे येणारे संदेश, मतदार यादीमधील मतदारांविषयी बदल तात्काळ स्वीकारुन त्याबाबतची कार्यवाही बीएलओ स्तरावर करुन पर्यवेक्षकांना त्याबाबत अवगत करावे, बीएलओ यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे क्षेत्रामध्ये मतदार यादीनुसार सर्व मतदारांची नावे व त्यांची इतर माहिती योग्य असलेबाबत खात्री करुन त्याचा अहवाल निवडणूक कार्यालयास सादर करावा. निवडणूक कार्यालयाकडून गृह मतदान करणारे मतदारांची यादी उपलब्ध करुन दिल्यानंतर त्याबाबतची सर्व कार्यवाही करणे, नेमून दिलेल्या मतदानकेंद्रांवर प्रत्यक्ष मतदानाचे दिवसाकरिता मतदारांसाठी प्राथमिक सोयी-सुविधा, मतदान केंद्राकडे जाणारा रस्ता व वाहन लावणेबाबतची जागा सुस्थितीत असलेबाबत बीएलओ स्तरावर पूर्णतः खात्री करुन संबंधित पर्यवेक्षकांकडे
व सेक्टर ऑफीसर यांचेकडे अहवाल तात्काळ सादर करावा,अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी श्री. भंडारे यांनी दिल्या.
प्रशिक्षणामध्ये स्वीप समन्वय अधिकारी श्री.कुरळे यांनी मतदार जनजागृती व सर्व निवडणूक कामकाज पारदर्शीपणे करणेबाबतची शपथ दिली.