पुणे. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याच्या वचनासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून दत्ता बहिरट यांची निवड करण्यात आली आहे. प्रचाराच्या प्रमुख पदासाठी माजी आमदार दीप्ती चौधरी यांची नेमणूक करण्यात आली असून, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे प्रभारी अभय छाजेड यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला गती देण्यात येत आहे.
प्रचार निवडणूक प्रमुख माजी आमदार दीप्ती चौधरी, मतदारसंघ प्रभारी अभय छाजेड, यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता बहिरट यांच्या प्रचाराची रणनीती आखली जात आहे. त्यांचा अनुभव आणि जनसेवेचा दृढ निश्चय या प्रचारामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडी या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध आहेत.
दत्ता बहिरट यांची निवडणुकीतील मुख्य मुद्दे:
1. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी – तरुणांना शिक्षणात उत्तम संधी देऊन त्यांच्या करिअरसाठी रोजगार उपलब्ध करून देणे.
2. महिला सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न – महिला सुरक्षेसाठी ठोस योजना राबविणे.
3. पायाभूत सुविधांचा विकास – रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा, जलव्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर.
4. पर्यावरण संवर्धन – परिसर स्वच्छता व हरित शिवाजीनगर संकल्पना राबविणे.
5. आरोग्य सेवा व सामाजिक सुरक्षा – सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा व आपत्कालीन सुविधांची उपलब्धता.
आगामी निवडणुकीत छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचा मोलाचा पाठिंबा देऊन दत्ता बहिरट यांना विजयी करून त्यांच्या अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प), शिवसेना (उबाठा) व मित्रपक्ष आघाडीने केले आहे.