पुणे .महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवणाऱ्यांना, राज्यास दिवाळखोर करुन, भ्रष्टाचारावर पांघरूण घालणाऱ्या “महा(भ्रष्ट) युती”स सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन करीत.. सार्वजनिक आरोग्य सुविघांच्या, रखडलेल्या डीपी’च्या नियोजनबध्द अंमलबजावणी करीता, महाविकास आधाडी ऊमेदवारांना ‘निर्णायक ऊच्चांकी मतांनी’ विजयी करण्याचे आवाहन पुणे शहरातील जेष्ठ काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.
वारंवार होणाऱ्या ‘वहातुक कोंडीतुन’ पुणेकरांची कायम स्वरुपी सुटका होणे गरजेचे आहें. त्या करीता, वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेल्या ‘त्याच व तेवढ्याच रुदींच्या रस्त्यांचे व रस्त्यालगत पार्कींगचे नियोजन करणे ही पुणे शहरातील वास्तवतेची व काळाची गरज आहे..!
वर्षानुवर्षे सतत केवळ व केवळ “संभाव्य व नियोजीत रस्तारुंदी” ग्राह्य धरून, व मेट्रोचा एफएसआय ची उधळण करऊन, बेधुंद बांधकाम परवानग्या देणे, हा शुध्द मुर्खपणा असुन, प्राप्त परीस्थितीत वहातुक – दळण_वळणाच्या संकल्पनेला छेद देणारा, अनावस्था व अनागोंदी निर्माण करणारा ‘अनियंत्रीत विकास’ असल्याची प्रखर टिका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, शहरातील अस्तित्वातील रस्त्या लगतच्या “रहीवासी वा व्यवसाईक” बहुमजली उच्चांकी ऊंचीच्या प्रकल्पांमधील, किमान १० ते १५ % वाहने दिवसा (कार्यालयीन वेळेत) जरी बाहेर पडली तर वारंवार वहातुक कोंडी होते ही वास्तवता नजरेआड करता येणार नाही. त्यामुळे अस्तित्वातील बांधकामांना पुरेशी दळण – वळण, वहातुक व पार्किंग व्यवस्था निर्माण होई पर्यंत तातडीने स्थगिती देऊन बांधकामे नियंत्रिणा खाली आणणे गरजेचे आहे..! या करीता राज्य पातळीवर शहर नियोजनाचे फेर धोरण आखणे ही काळाची गरज आहे..!
आवश्यक नव्हे तर ‘अत्यावश्यक पार्किंग सुविघा अभावी मेट्रोचे जाळे’ तयार करणे हे शहर नियोजनात शहाणपणाचे लक्षण नाही..!
मुठा नदीतील पात्राची पाण्याची वहन क्षमतेकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत, पुराचा धोका सतत नजरेआड करून, केवळ “सुशोभीकरणाच्या नावाखाली” भ्रष्टाचाराचे चोचले पुरवण्यासाठी, दुरदृष्टी अभावाचा विकास पुणेकरांना परवडणारा नाही. नदीपात्र सुशोभिकरणाच्या नांवा खाली, नागरी पैसा ऊधळुन, कामे करत असल्याचे सोंग आणणे ही पुणे करांच्या डोळ्यात निव्वळ धुळफेक आहे.
मनपाचे हजारो कोटी ‘बँकांचे अस्तित्व जपण्या करीता’ डीपॅाझीट्स मघ्ये ठेऊन, पुणे करांना विकासा पासुन वंचित ठेवणे, ही सत्ताघाऱ्यांची जनतेप्रती प्रतारणा चालली आहे.
या सर्व गैर प्रकारांना मुठमाती देण्या करीतां स्वच्छ – सुंदर व पर्यावरण पुरक, वहातुक – व्यवस्थेचे पुणे शहर उभारण्या करीता .. महाविकास आघाडीच्याच ऊमेदवारांना निर्णायक उच्चांकी मतांनी विजयी करण्याचे विनम्र आवाहन पुणे शहरातील जेष्ठ काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले..!
ते पुढे म्हणाले की, आपण सामाजिक व राजकीय जीवनात पुणे शहरात गेली ४० वर्षे काँग्रेस विचारांची निष्ठोने कास धरून कार्यरत आहोत. नारायण – सदाशीव पेठ परीसरांतुन पुणे मनपा’वर निवडुन जाऊन महत्वाकांक्षी विकासांचे प्रकल्प राबवलेत व या पुढे ही पुणेकरांच्या सेवेत राहू ईच्छीत आहोत. त्या करीता आपल्या पक्षाच्या सहकार्याने देखील, पाठपुरावा करून ईच्छित विकास साधू शकू याचा निश्चित विश्वास असल्यानेच, महाविकास आघाडी पैकी किमान “काँग्रेस ऊमेदवारांच्या” कामाची व कर्तव्य पुर्ततेची हमी व गॅरंटी आपण स्वतः व्यक्तिशः निश्चितपणे घेत असल्याचे.. ही त्यांनी दिलेल्या निवेदनात जाहीर केले आहे.