हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव २४ पासुन सुरु
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ अर्थात् द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ यंदाच्या वर्षी २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत श्री विद्याधिराज सभागृह, श्री रामनाथ देवस्थान, बांदोडा, फोंडा, गोवा येथे आयोजित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या हिंदु अधिवेशनांना आपण दिलेल्या प्रसिद्धीमुळे हा विषय समाजापर्यंत पोचला. याविषयी आम्ही आपले आभारी आहोत. आजवर झालेल्या ११ हिंदु अधिवेशनांना दरवर्षी मिळणारा प्रतिसाद वाढतच आहे. या अधिवेशनांतून २५ राज्यांतून १००० पेक्षा अधिक हिंदु संघटना संघटित झाल्या आहेत.
या अधिवेशनांचे वैशिष्ट्य म्हणजे नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश आणि अन्य देशांतूनही संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, विचारवंत आदी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. भारत आज तिसर्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहे. असे असूनही जगात हिंदूंवर होत असलेले अत्याचार कमी होत नसून ते वाढत आहेत. हिंदु धर्माला ‘डेंग्यू, मलेरिया’, अशा रोगांची उपमा देऊन तो संपवण्याची भाषा केली जात आहे. प्रतिवर्षी लाखो हिंदूंचे फसवून धर्मांतर केले जात आहे. कलास्वातंत्र्याच्या नावाखाली चित्रपट, मालिका, वेब सीरिज आदी माध्यमांतून हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवली जाते, तर भारतीय अर्थव्यवस्थेला सुरूंग लावण्यासाठी ‘हलाल अर्थव्यवस्था’ उभी करून हिंदूंना हलाल खाद्यपदार्थ घेण्यास बाध्य केले जाते. भारतविरोधी चळवळी कॅनडासह अनेक देशांमध्ये डोके वर काढत असून हिंदूंच्या मंदिरांवर जाणीवपूर्वक आक्रमणे केली जात आहेत. अशा सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हा एकमेव उपाय आहे !
तरी संविधानिकदृष्ट्या ‘भारत हे हिंदु राष्ट्र व्हावे’ यासाठी व्यापक प्रयत्नांची दिशा ठरवणे, सनातन धर्माच्या सुरक्षेसाठी वैचारिक स्तरावर प्रयत्न करणे, मंदिरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे, मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी संघटन वाढवणे, ‘जिहादी आतंकवाद’ आणि ‘गझवा-ए-हिंद’सारख्या भारतविरोधी संकटांना तोंड देण्यासाठी व्यापक जनजागृती करणे, हे या अधिवेशनाचे स्वरूप असेल. हे कार्य समाजापर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे. केवळ आपल्या सहकार्यानेच हे होऊ शकेल. या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ अर्थात् द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे प्रसिद्धीपत्रक, लेख, व्हीडीओ बाईट यांना व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशी आपल्याला विनंती आहे !