लोणी काळभोर येथील गुरुद्वारासाठी सिनर्जी राउंड टेबल 177 ने दिले योगदान
पुणे: राऊंड टेबल इंडिया चॅप्टर सिनर्जी राऊंड टेबल 177 ने पुण्यातील लोणी काळभोर येथील गुरुद्वाराच्या बांधकामासाठी 360 पोती सिमेंटचे योगदान दिले आहे.
संपूर्ण गुरुद्वारा समितीने राऊंड टेबल इंडियाच्या प्रतिनिधींची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या गरजा समजावून सांगितल्या.
पुणे सिनर्जी राऊंड टेबलने 360 बॅग्सद्वारे सुरू केलेल्या या कामात त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, याशिवाय इतर संभाव्य मार्गानेही ते सहकार्य करतील. राउंड टेबल इंडिया 177 चे अध्यक्ष टीआर प्रतिक सिंघल, सदस्य टीआर रिशु बावेजा आणि राष्ट्रीय संयोजक टीआर राहुल वाधवा यांनी वंचित मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या मदतीबद्दल आणि मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी त्यांच्या दीर्घकालीन कार्याबद्दल देखील बोलले.
गुरुद्वारा समिती आणि राऊंड टेबल इंडियाने भविष्यात शाळेच्या शक्यतेवरही चर्चा केली.