पुणे.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड मधील इस्कॉन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिरात आलेल्या बालसाधकांची वेशभूषा पाहून त्याबद्दल आनंद व्यक्त करत; संस्थेकडून लहान मुलांवर उत्तम संस्कार होत असल्याची भावना व्यक्त केली.
पाटील म्हणाले की, आजच्या आधुनिक काळात पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे चुकीचे संस्कार मुलांवर होत आहेत. फॅशनच्या नावावर काहीही गोष्टी घडत आहेत. अशा काळात इस्कॉन सारख्या संस्थामुळे भारतीय संस्कृतीची जपणूक केली जाते हे अतिशय कौतुकास्पद आणि आनंददायी आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी पाटील इस्कॉन मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू पाद यांचे दर्शन घेतले. तसेच, सुंदर शाम प्रभू यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी इस्कॉनचे संजय भोसले हे देखील उपस्थित होते.